आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार 20 जुलै 2021 रोजी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...
मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळू शकेल. आनंदी दिवस.
वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. साहेबांना आज गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील.
मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. आज आशादायी दिवस.
कर्क : शुभ रंग : तांबडा| अंक : १
आज तुम्ही आधी स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा.
सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : २
कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नास आज दैवाची साथ निश्चित.
कन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ३
उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कृपा राहील.
तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ५
नोकरीच्या ठिकाणी अनुकूलता वाढेल. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. अनपेक्षित लाभ होतील.
वृश्चिक : शुभ रंग : पांढरा|अंक : ४
आज घरात थोरांशी मतभेद संभवतात. फार ताणू नका. दूरच्या प्रवासात आज मौल्यवान ऐवज सांभाळा.
धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ६
नोकरी-धंद्याच्या ठिकाणी आज अहंकारास थारा देऊ नका. मृदू वाणीनेच अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील.
मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
सर्व लहान-मोठे आर्थिक व्यवहार यशस्वीरीत्या पार पडतील. पैशाची आवक मुबलक राहील. शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, लक्षच देऊ नका.
कुंभ : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ७
कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. आज अपेक्षित मेल्स येतील. प्रापर्टीविषयक आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. मातोश्रींच्या हो ला हो करून विषय संपवा.
मीन : शुभ रंग : पिस्ता|अंक : ९
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. कलाकारांना यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावे लागेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.