आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 31 ऑगस्ट रोजी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल.

वृषभ: शुभ रंग : लाल | अंक : ३
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस. लावा.

मिथुन : शुभ रंग : केशरी | अंक : ८
आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. तब्येतीस जपावे.

कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६
आज नोकरीच्या ठिकाणी बढती, बदलीच्या बातम्या येतील.ज्येष्ठ मंडळी तीर्थाटनाचे बेत आखतील.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
आधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. मनाजोगत्या घटना घडतील.

कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडून सहकार्याची अपेक्षा नको.

तूळ : शुभ रंग : राखाडी | अंक : ४
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य देणार आहात. नोकरीत वरिष्ठ तुमची मते समजून घेतील.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
आज अती आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल. नवीन ओळखीत सावध राहा. प्रवासात सतर्क राहा.

धनू : शुभ रंग : निळा| अंक : ५
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.तरुणांनी गैरवर्तन टाळावे. शेजारी घरोबा वाढेल.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
पारिवारिक सुखात वृद्धीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी-विक्री फायद्यातच राहील. तरुण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. अधिकारांचा दुरुपयोग टाळावा.

बातम्या आणखी आहेत...