आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजपासून सुरु होत आहे पवित्र श्रावण मास

मंगळवार 21 जुलै रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजपासून महादेवाचा प्रिय महिना श्रावण सुरु आहे. आजच्या या शुभ योगामध्ये 12 पैकी 7 राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास मदत मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामामध्ये वरिष्ठांची मदत मिळेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
कुठलीही गोष्ट सहज शक्य नाही. तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल. भटकंती होईल.

वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : २
कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेपूर राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. गृहस्वामिनी व बच्चेकंपनी हसतमुख असतील. छान दिवस.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज प्रत्येक निर्णय सकारात्मकतेने घ्याल. मानसन्मानात वद्धी होईल. उत्तम दिवस.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ५
दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत. आज मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

सिंह : शुभ रंग : निळा| अंक : ७
राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. वजनदार असलेले खिसे संध्याकाळी रिकामे होतील. शब्द पाळावे लागतील.

कन्या : शुभ रंग : तांबडा| अंक : ८
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. अडचणीच्या प्रसंगी मित्र धावून येतील.

तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ५
आत्मविश्वास व मनोबलात वद्धी होईल. महत्त्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतर करावे. दैव साथ देईल.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९
घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकावू नका.

धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४
महत्त्वाची सर्व कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.

मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : २
नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. तरुणांना घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. तब्येत सांभाळा.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
पारिवारिक समस्या सहजच सुटल्याने. तुम्ही आनंदी व उत्साही असाल. कलाकारांना तर चाहते डोक्यावर घेतील.