आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार, 21 जून रोजी ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून आजच्या दिवशी उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे मंगळवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...
मेष : शुभ रंग : आकाशी| अंक : २
आज काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नको.
वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आज धंद्यातील आवक अपेक्षे पेक्षा जास्त राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा आज पूर्ण होतील.
मिथुन : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीच्या ठीकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील.
कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
आज तुम्हाला अध्यात्मिक विषयात गोडी निर्माण होइल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.
सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ९
आज कमी कष्टांत जास्त लाभाचा मोह नको. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका. विरोधक टपलेत.
कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांना यश सोपे नाही, परिश्रम वाढवायला हवेत.
तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. हितशत्रू मित्रांमधेच लपलेले असतील, सावध राहीलेले बरे.
वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ३
आज आपलेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. घाईगर्दीत आज काही चुकीचे निर्णय घेतले जातील.
धनु : शुभ रंग : लाल | अंक : १
काही घरी प्रिय पाहुण्यांचे आगमन संभवते. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. वाणीत मृदुता असावी.
मकर : शुभ रंग : निळा| अंक : २
आज उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.
कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
आज काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे राहील.
मीन : शुभ रंग : भगवा| अंक : ५
अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. काही पेचप्रसंग यशस्वीरीत्या सोडवाल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.