आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 20 ऑक्टोबर रोजी चंद्र केतुसोबत राहील. यासोबतच चंद्रावर केतूची दृष्टी पडत असल्यामुळे अशुभ योग जुळून येत आहे. आजच्या ग्रह-स्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये मन लागणार नाही. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. वैवाहिक जीवनात थोडेफार मतभेद असतील.

वृषभ : शुभ रंग : मोरपिशी| अंक : १
मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस थारा नको.

मिथुन : शुभ रंग : मोतिया|अंक : २
महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मोलाचा असेल. दिलेल्या अश्वासनांवर अवलंबून राहू नका.

कर्क : शुभ रंग : मरून|अंक : ३
आवक उत्तम राहील. मुलांच्या मागण्या हौशीने पुरवाल. कलाकार मिळालेल्या संधींचे सोने करतील.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ८
काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश सोपे होईल.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
आज काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. भावंडांचे मात्र आज एकमेकांना सहकार्य राहील.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : ७
तरुणांनी मर्यादेत राहणे हिताचे. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी| अंक : ९
तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील. रागावून निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येतील.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
व्यावसायिक स्पर्धेस तोंड देण्यासाठी नव्या योजना राबवाव्या लागतील. जुने विचार सोडावे लागतील.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
पूर्वीच्या कष्टांची फळे दृष्टिक्षेपात येतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. किचकट कामे मार्गी लागतील.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : १
आज रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. आपल्या कामातील तत्परतेने वरिष्ठांची मने जिंकाल.

मीन : शुभ रंग : हिरवा | अंक : ३
यथाशक्ती दानधर्म कराल. आपल्या कुवतीबाहेर जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

बातम्या आणखी आहेत...