आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी स्वाती नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर मंगळवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : १
नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण कितीही वाढला तरी वरिष्ठांचे सहकार्य राहील. घरात जोडीदाराकडूनही तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. काही शुभ समाचार यतील.

वृषभ | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : २
नोकरदारांना वरिष्ठ आज गोड बोलून राबवून घेतील. काही आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे राहील. कुणाला सल्ले देऊच नका.

मिथुन | शुभ रंग: क्रिम, शुभ अंक : ४
आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कमी श्रमांत जास्त लाभाची स्वप्ने पाहाल. आज तुम्ही हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्याल.

कर्क | शुभ रंग: मरून, शुभ अंक : ३
बऱ्याच दिवसांपास्ून रेंगाळलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृहोद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत चांगली राहील. मुले अभ्यासात लक्ष देतील.

सिंह | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ६
आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पांत तुमचा बराच वेळ फुकट जाईल. सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामी येतील. आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.

कन्या | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ७
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल. अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठबस अगत्याने कराल. आज मोजकेच बोलणे प्रभावी राहील.

तूळ | शुभ रंग: राखाडी, शुभ अंक : ५
आज तुम्ही स्वत:च्याच प्रेमात आहाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा अट्टहास राहील. तरी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय अनुभवींच्या सल्ल्यानेच घ्या.

वृश्चिक | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमाखर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल.कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. प्रवास कराल.

धनु | शुभ रंग: केशरी, शुभ अंक : ९
लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभ चिंता म्हणजे शुभच होईल. वाणीत गोडवा असू द्या.

मकर | शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ९
मित्रमंडळींना दुरूनच राम राम करून आज अापल्या ध्येयप्राप्तीस प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिध्द कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कुंभ | शुभ रंग: लाल, शुभ अंक : ३
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

मीन | शुभ रंग: सोनेरी, शुभ अंक : ५
कमी श्रमात जास्त लाभाची अपेक्षा करून चालणार नाही. विश्वासू मित्रांकडूनही दगा होऊ शकतो, सतर्क राहा. आज गाडी चालवताना गाणे गुणगुणू नका.

बातम्या आणखी आहेत...