आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार 

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ध्रुव नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

मंगळवार 23 जून रोजी पुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...


मेष: शुभ रंग : चंदेरी | अंक : १

कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा.


वृषभ: शुभ रंग : भगवा | अंक : ४

काहीजणांना घरदुरुस्तीच्या काही किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. सतर्क रहा.


मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. रखडलेले उपक्रम जोमाने सुरू करता येतील.


कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २

आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक चुका काढतील.


सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. खर्चाचे प्रमाण आवाक्या बाहेर जाणार आहे.


कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७

प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.


तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ५

अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी वेळ काढणे अशक्य होईल.


वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ८

व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने नव्या उपक्रमाची सुरवात टाळा. सहवास लाभेल.


धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : ९

आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत. वाद टाळावेत.


मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. पत्नीस वेळ द्या.


कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम होईल. विश्रांतीची गरज भासेल. येणी असतील तर वसूल होतील.


मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ४

प्रकृती ठणठणीत असल्याने तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.

0