आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 23 मार्च रोजीपुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून, आजची ग्रहस्थिती शोभन नावाचा खास योग तयार करत आहे. आजच्या ग्रहस्थितीचा लाभ 12 पैकी 6 राशीच्या लोकांना होईल. या लोकांची महत्त्वाची कामे कामे आज वेळेवर पूर्ण होऊ शकतात. नोकरी व्यवसायात नवीन संधी चालून येतील.. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या,तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ५
एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज स्थावराच्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे.

वृषभ: शुभ रंग : क्रीम| अंक : ६
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. कार्यक्षेत्रात आज मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : १
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. तुमच्या सडेतोड बोलण्याने तुमचेच काही मित्र दुरावतील.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : २
रिकाम्या चर्चेत वेळ फुकट जाईल. महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडेल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी|अंक : १
उच्चशिक्षितांना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस.

कन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ४
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरू राहील. मित्रांपासून दोन हात लांब राहा.

तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
नोकरीत कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
हौसमौज जरूर करा, पण आपल्या मर्यादा सांभाळा.कुसंगतीपासून लांबच राहा. वाहन चालवताना जपून.

धनू : शुभ रंग : भगवा|अंक : ८
कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. वैवाहिक जीवनात लाडीक रुसवेफुगवे असतील.

मकर : शुभ रंग : आकाशी|अंक : ६
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. पथ्यपाणी नाही पाळलेत तर आजार बळावू शकताे.

कुंभ : शुभ रंग : निळा| अंक : ७
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी नको. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. रुग्ण ठणठणीत बरे होतील.

मीन : शुभ रंग : मरून| अंक : ९
कार्यक्षेत्रात अथक परिश्रमांचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला, क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढवावेत. संततीकडून सुवार्ता येतील.

बातम्या आणखी आहेत...