आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 24 ऑगस्ट रोजी पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : जांभळा | अंक : १
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवावेसे वाटेल, पण तसे करू नका. आज मातोश्रींनी दिलेले सल्ले विचारात घ्या.

वृषभ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
वैवाहिक जीवनात असलेले किरकोळ मतभेद आज सुसंवादाने मिटू शकतील. आज गृहसौख्याचा दिवस.

मिथुन : शुभ रंग : भगवा | अंक : ४
हौसमौज कराल, पण मर्यादांचे उल्लंघन करू नका. आज कायद्यात राहा. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्यावे.

कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : २
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. अति व्यग्र दिवस.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६
महत्त्वपूर्ण चर्चेत फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्ले नको. अतिहुशार माणसे संपर्कात येतील.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ८
आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवाद टाळा.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७
हौशी मंडळी जिवाची मुंबई करतील. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. उत्साही दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : १
आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील.छान दिवस.

मकर : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ६
घराबाहेर रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अति स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. गुपिते उघड होतील.

कुंभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३
पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने काही मतभेद होऊ शकतात.

मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

बातम्या आणखी आहेत...