आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

मंगळवार 24 नोव्हेंबरला पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. या व्यितिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणार राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : राखाडी| अंक : २
आवश्यक खर्च करावेच लागतील. बचतीचा विचार आज सोडून द्या. घरात थोर मंडळींच्या होला हो करा.

वृषभ: शुभ रंग : मरून| अंक : ३
वाणीत गोडवा ठेऊन विरोधकांनाही आपलेसे करु शकाल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.

मिथुन : शुभ रंग : डाळींबी| अंक : ६
नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : १
नोकरीच्या ठीकाणी बिनचूक कामास प्राधान्य द्या. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. दैवाची साथ आहे.

सिंह :शुभ रंग : लाल| अंक : २
घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवायला हवे.काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा.

कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. विवाह विषयक बोलणी आज सकारात्मकतेने पार पडतील.

तूळ : शुभ रंग : सोनेरी|अंक : ३
संयमाची कसोटी राहील. दिवस तितकासा अनुकूल नसला तरी काही येणी असतील तर वसूल होतील.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा|अंक : ५
आज तुम्ही उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना आज प्रकृती उत्तम साथ देईल.

धनु : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलींग सारखे व्यवसाय तेजीत चालतील.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व धावपळच जास्त होईल. भावंडात सामंजस्य राहील.

कुंभ : शुभ रंग :मोरपंखी|अंक : ७
कार्यक्षेत्रात तुमचा मानमतराब वाढेल. अनपेक्षित हाेणारे लाभ मनाला दिलासा देतील. छान दिवस.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ९
मनाच्या लहरीपणास थोडासा लगाम गरजेचा आहे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser