आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 26 जानेवारी रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग: मोरपंखी| अंक : २
कार्यालयीन कामासाठी आज काही जवळपासचे प्रवास घडतील. प्रवासातील ओळखी भविष्यात कामी येतील.

वृषभ: शुभ रंग: मोतिया| अंक : १
आवडत्या क्षेत्रात नेतृत्व कराल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा.शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणाने काही कुरबुर हाेईल.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ४
समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक अजिबात करू नका. वैवाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या. खेळाडूंना अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ३
अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. कलाकारांचा विदेशी नावलौकिक होईल.

सिंह :शुभ रंग : जांभळा|अंक : ६
पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून काही अनपेक्षित लाभ होईल. आज घरासाठी एखादी मौल्यवान खरेदी कराल.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ५
कार्यक्षेत्रात नव्याने चालून आलेल्या संधींचा फायदा घेणे तुमच्या हाती आहे. वेळीच अचूक निर्णय घेणे गरजेचे.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
कौटुंबिक सदस्यांची नाराजी पत्करावी लागेल. आज वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल.

वृश्चिक : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
आपल्या मर्यादेबाहेर कोणतेही धाडस करू नका. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. कष्टाने यश साध्य.

धनु : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वक्ते सभा गाजवतील.

मकर : शुभ रंग : मरून| अंक : १
आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.

कुंभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ६
आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील.

मीन : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. गृहीणींना आज सवड नाही.