आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज दिवसभर राहणार एक अशुभ योग, नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना होऊ शकते धनहानी

मंगळवार 26 मे रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. मंगळवारच्या या अशुभ योगामुळे 5 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : केशरी | अंक : ४

आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. घराबाहेर वादविवाद टाळा.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. आत्मविश्वासाने नव्या योजना राबवता येतील. स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. गरजूंना मदत कराल.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

हट्टीपणास लगाम घालून. इतरांचेही विचार ऐकून घ्या. आज तुम्ही भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. अध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.

सिंह : शुभ रंग : राखाडी | अंक : ७

कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ८

नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरीष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील.

तूळ : शुभ रंग : लाल | अंक : ६

आज हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपिशी| अंक : ५

काही कौटुंबिक अडचणी तुम्हाला चिंताग्रस्त करतील. प्रक़ृतीकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराचे मन समजून घ्यावे.

धनू : शुभ रंग : मरून| अंक : ४

आज तुम्ही अत्यंत आनंदी, उत्साही व ताजेतवाने असाल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. छान दिवस.

मकर : शुभ रंग : क्रिम | अंक : २

एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. दिवस कष्टांचा.

कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : १

बरेच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. नोकरीत बदलाच्या संधी.

मीन : शुभ रंग : निळा| अंक : ३

आर्थिक बाजू उत्तम असेल. आज घरसजावटीच्या काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. आज मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल. 

बातम्या आणखी आहेत...