आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 27 एप्रिल रोजी स्वाती नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. जोडीदारास दिलेला शब्द पाळणे हिताचे राहील.

वृषभ: शुभ रंग : जांभळा| अंक : ८
कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात करू शकाल. जोडीदाराच्या चुका काढायची चूक करू नका. रुग्णांनी पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळावे.

मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ७
आज जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. पतप्रतिष्ठा वाढेल. यशदायी दिवस. मुलांना दिलेली वचने पाळावी लागणार आहेत.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
जागेसंबंधी महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.वेळेचे योग्य नियोजन केल्याने यशाचा मार्ग सोपा होईल.

सिंह :शुभ रंग : डाळिंबी|अंक : १
संमिश्र फळे देणारा दिवस असून जमाखर्च समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ५
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस असून उत्पन्नाचे विविध मार्ग तयार होतील. आज शब्द जपून वापरा.

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : २
कार्यक्षेत्रात विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल.आज एखाद्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणार आहात.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
जमाखर्चाचा मेळ बसवणे अवघड जाईल. गृहिणींना क्षणभरही उसंत मिळणे कठीण आहे. व्यग्र दिवस.

धनु : शुभ रंग : निळा|अंक : ६
स्वत:ची हौसमौज पुरवण्यासाठी सढळ हस्ते पैसे खर्च कराल. जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवाल.

मकर : शुभ रंग : मरून|अंक : ४
आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागू शकते.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ५
इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रामाणिक प्रयत्नांस दैव साथ देईलच.

मीन : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात, फार ताणून धरू नका. सासुरवाडीकडून लाभ संभवतो. वाहनाच्या वेगावर ताबा ठेवा.

बातम्या आणखी आहेत...