आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
दैनंदिन सर्व कामे सुरळीत पार पडतील. स्वत:चे छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल. दिवस लाभाचा.

वृषभ : शुभ रंग : क्रीम| अंक : १
नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होईल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हिताचे राहील. पिताश्री योग्य सल्ले देतील. मित्रांना लांबच ठेवा.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.

कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : २
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा. चुकीची संगत टाळावी.

सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येये साध्य होतील.

कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
अप्रिय माणसे संपर्कात येतील. मोफत सल्लागार मंडळीही बोअर करतील. आज संयमाची गरज.

तूळ : शुभ रंग : मोरपिशी|अंक : ३
व्यापार-उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहाल. नेतृत्वाची संधी मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी|अंक : ६
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : २
नवीन व्यावसायात मर्यादा ओळखूनच उलाढाली करा. अति आक्रमकतेने निराशा पदरी पडेल.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्वीकाराल. स्पर्धा जिंकाल.

कुंभ : शुभ रंग : सोनेरी|अंक : ४
आज हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर करू नका.

मीन : शुभ रंग : निळा|अंक : १
आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. मित्र विश्वासघात करतील.