आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी मृगशीर्ष नक्षत्र यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष: शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. आज संध्याकाळी प्रिय व्यक्तीसह मॉलमधे फेरफटका माराल.

वृषभ: शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आज अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात मतभेद संभवतात.

मिथुन : शुभ रंग : नारिंगी|अंक : ३
एखादा पत्ता शोधण्यासाठी बरीच पायपीट होणार अाहे. आज कुठलीही गोष्ट सहज मिळणार नाही.

कर्क : शुभ रंग : लाल|अंक : ४
सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.

सिंह :शुभ रंग : गुलाबी|अंक : २
उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल.

कन्या : शुभ रंग : सोनेरी|अंक : १
व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजू नका. काही येणी आज मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : क्रिम| अंक : ६
उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. मित्रांमधे काही वैचारीक मतभेद होतील.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
आज कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावाल. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल.

धनु : शुभ रंग : मरून | अंक : ९
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. नवीन ओळखीत व्यवहार करताना सतर्क रहा.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू आहे. अपूरी स्वप्ने साकार होतील.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
काही फसव्या संधी येतील. हातचे सोडून पळत्या मागे धाऊ नका. कायद्याचे उलंघन महागात पडेल.

बातम्या आणखी आहेत...