आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 29 सप्टेंबर रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यासोबतच शूल नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी सहा राशीच्या लोकांना आज सांभाळून राहावे लागेल. जॉब आणि बिझनेसमध्ये घाई करू नये. मोठे निर्णय घेण्यापूर्वी योग व्यक्तीचा सल्ला घ्यावा. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : आकाशी | अंक : १
वेळेचे योग्य नियोजन केल्याने क्लीष्ट कामे वेळेत पूर्ण होतील. धंद्यातील स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. जोडीदारासह जुन्या फोटोंचा अल्बम चाळाल.

वृषभ: शुभ रंग : पिवळा | अंक : ३
द्विधा मन:स्थीती असताना महत्वाचे निर्णय टाळलेले बरे. आज अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल. वाहन चालवताना सावध रहा.

मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : २
नोकरीत अाज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. विरोधक तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे. आज पैजा जिंकाल.

कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : ८
तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. प्रतिष्ठीत व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रेमप्रकरणे लग्नाच्या दिशेने पुढे सरकतील. हट्ट पुरे झाल्याने मुले खुष असतील.

सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
स्थावर, शेतीवाडी संदर्भातील काही अपुरे व्यवहार मार्गी लागतील. गृहीणी आज घराची स्वच्छता व सजाट मनावर घेतील. प्रेमप्रकरणे बोअरच करतील.

कन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ८
जाळपासच्या प्रवासात रेशीमगाठी जुळतील.शेजारी आपलेपणाने डोकावतील. मुले मात्र अभ्यासाची टाळाटाळ करतील. जास्त वेळ घराबरहेर रहाल.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
कष्टांच्या प्रमाणात आज मोबदलाही उत्तम राहील. प्रिय पाहुण्यांची घरात ये जा राहील. गृहीणींना आवडत्या छंदातूनही अर्थप्राप्ती होईल. संसारात गोडवा राहील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
कार्यक्षेत्रात चढाओढ असली तरी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश नक्कीच मळेल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. आज जोडीदाराशी सुसंवाद राहील.

धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७
घराबाहेर वावरताना रागिट स्वभाव काबूत ठेवणे गरजेचे. आपली मते इतरांना पटावण्याचा अट्टहास नको. गुंनवणूक करताना तज्ञांचा सल्ला अवश्यक.

मकर : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १
आप्तसवकिय व मित्रमंडळींत तुमचे महत्व वाढणार असून. विरोधकांनाही तुमच्या यशाचा हेवा वाटेल. नव्या व्यावसायिकांनी मर्यादीत धाडस करायला हरकत नाही.

कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. वरीष्ठ कामगारांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करतील. आज तुमचा अहंकार वाढण्याची शक्यता आहे.

मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ५
आज तुमचा काहीसा निराशावादी दृष्टीकोन राहील.घरातील थोर मंडळी काहीशी हट्टीपणाने वागतील. व्यवसायातील मंदीने बेचैन व्हाल. सत्संगाची ओढ लागेल.