आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात. मंगळवार 3 मी रोजी रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. आजच्या ग्रहस्थितीचा लाभ 12 पैकी 6 राशीच्या लोकांना होईल. या सहा राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. इतर या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ३
महत्वाच्या चर्चेत इतरांची मते समजून घ्या. आपलेच खरे करण्याचा अट्टहास नको. तब्येत थोडी नरम असेल.

वृषभ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
आज स्वत:ची हौसमौज भागवण्यासाठी सढळ हस्ते खर्च कराल. जमाखर्चाचा ताळमेळ साधताना तारेवरची कसरत होईल. घराबाहेर वादविवाद नकोत.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २
समाजात व मित्रमंडळींत मानमतराब वाढेल. एखाद्या सामाजिक कार्यात तुमचं योगदान द्याल. व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. नवे उपक्रम बिनधास्त सुरू करा.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. घराबाहेर कायद्याचे पालन गरजेचे.

सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३
नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. आज उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने थोडे विरोधी ग्रहमान आहे.

कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : ५
कष्टांच्या प्रमाणात मोबदला जेमतेम राहील. घराबाहेर रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. छान दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ४
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. आज व्यग्र दिवस.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
योग्य माणसे संपर्कात येतील. अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
आज काही महत्वाचे निर्णय घेताना तुमची द्विधा मन:स्थिती होईल. प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल.

कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : ७
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९
आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल.

बातम्या आणखी आहेत...