आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 3 नोव्हेंबरचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : पांढरा| अंक : ४
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. अपल्या आवडत्या क्षेत्रात कतृत्व सिध्द करायची संधी मिळू शकेल.

वृषभ: शुभ रंग : आकाशी| अंक : १
आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
आज तुमची मोठया लोकांमधील उठबस काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ९
व्यावसायात उलाढाल वाढेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हानेे स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील.

सिंह :शुभ रंग : डाळिंबी| अंक : ८
वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.अाज आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे.

कन्या : शुभ रंग : सोनेरी|अंक : ७
क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी आज अभ्यासात चालढकलच करणार आहेत.

तूळ : शुभ रंग : चंदेरी|अंक : ५
आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी| अंक : ४
वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील.

धनु : शुभ रंग : सोनेरी| अंक : ६
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा.

मकर : शुभ रंग : क्रिम|अंक : १
घरात अधुनिक सुखसोयींसाठी खर्च कराल. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. आनंदी दिवस.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ३
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

मीन : शुभ रंग : मरून|अंक : २
दैनंदीन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल. टेलिफोन बिले भरावी लागतील.

बातम्या आणखी आहेत...