आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सौभाग्य नावाच्या शुभ योगाच्या होत आहे दिवसाची सुरुवात

मंगळवार 4 ऑगस्ट रोजी श्रवण नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर मंगळवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : मोरपिशी | अंक : २
प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरणार आहेत. आज तुम्ही मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात.

वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ८
दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ वाढेल.

मिथुन : शुभ रंग : भगवा | अंक : ५
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

कर्क : शुभ रंग : मरून | अंक : ६
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. वैवाहिक जिवनांत गोडवा.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. पत्नीला होच म्हणा.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९
कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. मुले आज्ञेत असतील.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : १
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
महत्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतर करावे. आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास नको.

धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. प्रवास कंटाळवाणे होतील.

मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ४
आज तब्येत ठणठणीत राहील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : १
कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने आज तुम्ही घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल.

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. नवे हितसंबंध निर्माण होतील.