आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळावर 4 जानेवारी रोजी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : लाल| अंक : ६
नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागेल.

वृषभ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

मिथुन : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
विरोधक सक्रिय आहेत. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका.

कर्क : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
दुकनातील गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस.

सिंह : शुभ रंग : केशरी| अंक : ६
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधून घ्यावा.

कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

तूळ : शुभ रंग : मोरपीशी| अंक : ४
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. आज सहकुटुंब चैन करावीशी वाटेल.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : १
आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

धनु : शुभ रंग : पांढरा| अंक : २
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व कार्यक्षेत्रात यश दृष्टीक्षेपात येईल. अाज वाणीत मृदुता ठेवलेली बरी.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे. व्यापाऱ्यांना वसुलीसाठी उत्तम दिवस आहे.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : १
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा.

मीन : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
कौटुंबिक सदस्यांमधे सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी आज केलीत तर सकारात्मकतेने पार पडतील.

बातम्या आणखी आहेत...