आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 5 एप्रिलला रेवती नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
आज मित्रपरिवारात तुमच्या शब्दास मान राहील. तरीही आज भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
आवक मनाजोगती असल्याने मन:स्थिती उत्तम राहील. सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील.

मिथुन : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ७
काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. डोळ्यांची निगा राखा.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
वैवाहीक जिवनात गोडी गुलाबी राहील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घ्याल.

सिंह : शुभ रंग : निळा| अंक : ५
नोकरीत वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

कन्या : शुभ रंग : चंदेरी | अंक : ९
शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : ६
कामगारांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे. मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : २
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरतील.

धनु : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.

मकर : शुभ रंग : हिरवा| अंक : १
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील. नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
सर्व कामे सुरळीत पार पडतील. गृहसौख्याचा दिवस आहे. आज कुटुंबियांस वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : १
दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

बातम्या आणखी आहेत...