आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 5 जानेवारीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे12 पैकी 8 राशीचे लोक भाग्यशाली राहतील. आज शोभन नावाचा योग जुळून येत असल्यामुळे बँकिंग सेक्टर, प्रॉपर्टी, ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग: राखाडी| अंक : ३
कार्यक्षेत्रात विरोधकांचा उपद्रव वाढेल. काही बिकट प्रसंग कौशल्याने हाताळाल. अवश्यक तेच बोला.

वृषभ: शुभ रंग: मोतिया| अंक : १
आज तुम्हाला आर्थिक उन्नत्तीचे विवध मार्ग खुणावतील. स्वत:च्या व्यक्तीमत्व विकासावरही भर द्याल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

मिथुन : शुभ रंग : क्रिम| अंक : ४
आज कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहीणी आज पसारा आवरण्यास प्राधान्य देतील.मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
अती स्पष्ट बोलल्याने नाती दूरावतील. आप्तस्वकीयांत वावरताना वाणीत मृदूता असुद्या. शेजारी सलोखा राहील.

सिंह :शुभ रंग : लाल|अंक : २
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात आर्थिक सुबत्ता नांदेल. पाहुण्यांची वर्दळ राहील.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ७
उद्योग व्यवसायात आक्रमकतेने घेतलेले निर्णय योग्यच ठरतील. सहकाऱ्यांवर अंकूश असणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
आज खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाईल. घरात थोर मंडळींचे उपदेश बाेअर करतील. संयमाची गरज.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. छान दिवस.

धनु : शुभ रंग : केशरी| अंक : ९
आज बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. मामा मावशी कडून काही सुवार्ता येतील. गृहीणींना थकवा जाणवेल.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
ज्येष्ठ मंडळी तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

कुंभ : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. कायद्याची चौकट मोडू नका.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील. मित्रांमध्ये शब्दास मान राहील.

बातम्या आणखी आहेत...