आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • आज 12 पैकी 6 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते

मंगळवार, 5 मे रोजी 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी हस्त नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • मेष: शुभ रंग : डाळिंबी | अंक : २

आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी असतील तर मागा, म्हणजे वसूल होतील. रूग्णांनी पथ्य सांभाळावे.

  • वृषभ: शुभ रंग : निळा | अंक : ३

पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. तरूण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त लावा.

  • मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६

आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे घात करतील.

  • कर्क : शुभ रंग : जांभळा | अंक : १

नोकरीच्या ठीकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील.ज्येष्ठ मंडळी  तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

                                                 

  • सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४

व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना तत्परतेने मदत कराल.

  • कन्या : शुभ रंग : लाल | अंक : ५

आज क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. स्वत:चेच  खरे करण्याकडे  तुमचा कल राहील. तुमच्याकडून आज काही आपलीच माणसे दुखावली जातील. 

  • तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७

काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. आपल्या बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

  • वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ८

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय, मित्रमंडळींत शब्दास मान राहील.

  • धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.

  • मकर : शुभ रंग : अबोली | अंक : ५

कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीरीत्या हताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल.

   

  • कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : २

आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. वेट अँड वॉच चे धोरण ठेवा.

  • मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : १

आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

बातम्या आणखी आहेत...