आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 6 एप्रिल रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : ६
धंद्यातील येणी वसूल झाल्याने मनावरील दडपण कमी होईल. कार्यक्षेत्रात स्वत:चे महत्त्व निर्माण कराल.

वृषभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. विरोधकांना चहा पाजूनच आपला कार्यभाग साधून घेणे हिताचे राहील. आज युक्तीने वागावे.

मिथुन : शुभ रंग : सोनेरी|अंक : ७
आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क : शुभ रंग : चंदेरी|अंक : ५
तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. पत्नीची आज्ञा पाळणे हिताचे.

सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून प्या.
कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
तरुणांनी मौजमजा करताना कायद्याचे भान ठेवावे. बेफिकीरपणास लगाम गरजेचा आहे. व्यसने टाळा.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
शेतीवाडीसंबंधित व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागतील.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ३
भावनेच्या भरात कुणाला वचने देऊ नका व कुणाला जामीन राहू नका. भावास मदतीची गरज भासेल.

धनू : शुभ रंग : मरून| अंक : १
रिकाम्या चर्चेतून वाद होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात. जीवनात गोडीगुलाबी राहील.

मकर : शुभ रंग : मोरपिशी| अंक : २
प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच. व्यावसायात वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवाल.

कुंभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ४
अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. दगदग होईल. बेरोजगारांनी घरापासून लांब जायची तयारी ठेवावी.

मीन : शुभ रंग : नरिंगी | अंक : ६
आज आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठ्या लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज दिलेले शब्द पाळतील

बातम्या आणखी आहेत...