आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंगळवार 6 ऑक्टोबर रोजी सूर्य-चंद्र आणि तिथी, वार, नक्षत्र मिळून सिद्धी नावाचा योग तयार करत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना मिळेल. जॉब आणि बिझनेसमध्ये कामाचे कौतुक होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन ओळखींचा भविष्यात लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....
मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : १
उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. मनाच्या लहरीपणास थोडासा लगाम गरजेचा आहे.
वृषभ: शुभ रंग : क्रीम| अंक : ३
आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार आज सोडूनच द्या. घरातील थोर मंडळींच्या हो ला हो करा.
मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ४
वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे करू शकाल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. उत्साह व कार्यक्षमता वाढेल.
कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : २
नोकरीच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र आश्वासने पाळणार नाहीत.
सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ६
रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज इतरांच्या भानगडीत न पडता फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
आज घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवायला हवे. आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. कायदा पाळा.
तूळ : शुभ रंग : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
कार्यक्षेत्रात मान वाढेल. अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना आशेचा किरण दिसेल.
वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ७
मानापमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. रुग्णांनी पथ्य सांभाळावे.
धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ८
पार्लर्स, फोटोग्राफी, मॉडेलिंगसारखे व्यवसाय तेजीत चालतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण हाेईल.
मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
अति दगदग टाळावी. महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून आज थोडे तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे राहील.
कुंभ : शुभ रंग : लाल| अंक : ६
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदगच जास्त होईल. शेजारी आपुलकीने वागतील.
मीन : शुभ रंग : निळा | अंक : ९
व्यापार-उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.