आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 7 जूनला पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी सहा राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : मोतिया| अंक : ३
उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

वृषभ : शुभ रंग : भगवा| अंक : १
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. आज प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता|अंक : २
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे.

कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा.

तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ९
कौटुंबिक सदस्यांमधे सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील आजचा दिवस उत्तम आहे.

वृश्चिक : शुभ रंग : डाळींबी| अंक : ७
आज नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल.

धनु : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. आज ताकही फूंकून प्या.

कुंभ : शुभ रंग : मारपंखी| अंक : ९
दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलून आपला स्वार्थ साधा.

बातम्या आणखी आहेत...