आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 7 सप्टेंबर रोजी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : मरून | अंक : ९
तब्येतीच्या किरकोळ तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही निर्णय उतावीळपणे घेणे योग्य ठरणार नाही.

वृषभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
बऱ्याच दिवसांनी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल. गृहिणी पार्लरसाठी वेळ काढा.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या.

कर्क : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. गृहिणींना वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा येईल.

सिंह : शुभ रंग : लाल | अंक : १
आज आर्थिक स्थिती चांगली असल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. अवघड कामे सोपी होतील.

कन्या : शुभ रंग : केशरी | अंक : ३
व्यवसायात पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल.कार्यक्षेत्रात फायदेशीर ओळखी होतील.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : २
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. कायदा पाळा.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल. विवाहविषयी बोलणी होकारार्थी पार पडतील.

धनू : शुभ रंग : भगवा| अंक : ५
अथक प्रयत्नांच्या जोरावर तुमची आज ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. व्यवसायात भिडस्तपणा नको.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : २
कार्यक्षेत्रात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. धाडस टाळा.

कुंभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ३
अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

मीन : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका.

बातम्या आणखी आहेत...