आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंगळवार 8 डिसेंबरला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...
मेष : शुभ रंग : मोतिया| अंक : २
आज रिकाम्या गप्पा टाळा. त्यातूनच गैरसमज पसरतील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.
वृषभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.
मिथुन : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
आवक समाधानकारक असल्याने तुमची मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. जोडीदाराची साथ मोलाची राहील.
कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील.
सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ८
कामगारांना ओव्हर टाइम करावा लागेल. काही देणी चुकवावी लागतील. अनावश्यक खर्च कमी करावा.
कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
नवीन व्यावसायिक मंडळींना यश दृष्टिक्षेपात येईल. आज कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील.
तूळ : शुभ रंग : पांढरा|अंक : ३
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. परिवारास वेळ द्याल.
वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता|अंक : ६
नोकरदारांना आज दडपणाखाली काम करावे लागेल. कामाच्या व्यापात घरगुती प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल.
धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ४
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावरच ढकला. शासकीय कामे रखडतील. गृहिणींचा देवधर्माकडे ओढा राहील.
मकर : शुभ रंग : तांबडा| अंक : ५
नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार नको. कष्टाची कामे करणाऱ्यांनी सुरक्षेची काळजी घ्यावी.
कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : २
अाज वैवाहिक जीवनात मधुरता राहील. घरात अाधुनिक सुखसुविधांसाठी हौशीने खर्च कराल.
मीन : शुभ रंग : गुलाबी|अंक : १
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांती गरजेची.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.