आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 8 नोव्हेंबर रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग पिस्ता, शुभ अंक : ९
तुमचा लहरी व संशयी स्वभाव काबूत ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान असावे.

वृषभ | शुभ रंग आकाशी, शुभ अंक : १
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीजवस्तू गहाळ होईल. सतर्क राहा.

मिथुन | शुभ रंग :भगवा, शुभ अंक : ८
आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध राहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

कर्क | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ४
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. कर्तव्यास प्राधान्य द्या.

सिंह | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ४
नाेकरी-धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा. संयम ठेवा.

कन्या | शुभ रंग :निळा, शुभ अंक : २
आजचा दिवस उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला.आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

तूळ | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ६
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.

वृश्चिक | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ३
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. कामाचे तास वाढवावे लागतील. आज तब्येत थोडी नरमच राहील. पती-पत्नींमधील काही मतभेद सामंजस्याने मिटतील.

धनु | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वत:चे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

मकर | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५
व्यापार-उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देईल. आज मातोश्रींचे सल्ले महत्त्वपूर्ण असतील.

कुंभ | शुभ रंग: लाल, शुभ अंक : ९
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

मीन | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ३
धंद्यात येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. मृदू वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.

बातम्या आणखी आहेत...