आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार

मंगळवार 8 सप्टेंबर रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रह-स्थितीमुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. अशुभ योगामुळे मंगळवारी 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. संयम बाळगावा. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
बेरोजगारांना घरापासून लांब रोजगाराच्या संधी येतील. उच्चशिक्षित असाल तर विदेश गमनाच्या संधी खुणावतील. आज खर्च मात्र आवाक्याबाहेर जाणार आहे.

वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ६
व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. अहंकार टाळून हितसंबंध जपणे गरजेचे आहे.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४
व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या.

कर्क : शुभ रंग : लाल | अंक : २
तुमच्यावर मित्रमंडळींचा प्रभाव राहील. आपला मोठेपणा जपण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. संध्याकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आनंदी दिवस.

सिंह : शुभ रंग : हिरवा| अंक : ५
नोकरीत उच्च्पदस्त असाल तर काही पेचप्रसंग सोडवावे लागतील. काही मनस्ताप देणारी मंडळीही भेटणार आहेत. हाताखालच्या लोकांशी मिळून मिसळून रहावे.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
थोडेफार नैराश्य जाणवेल. काही क्षुल्लक गोष्टी कारण नसताना मनाला लावून घ्याल. भिडस्तपणा मुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतील.

तूळ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
ऐकावे जनाचे पण करावे मनाचे असेच तुमचे आज धोरण असेल. मोफत सल्ला देणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नका, परंतू आज पत्नीचा सल्ला डावलू नका.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ७
ध्येयप्राप्तीसाठी अविश्रांत काम करण्याची तुमची तयारी असेल. तरीह आज कामाचे दडपण जाणवेल. तब्येतीची हेळसांड नको. विश्रांतीचीही गरज आहे.

धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
व्यवसायात अनपेक्षित पैसा येईल. रखडलेल्या योजना मार्गी लागतील. वडीलधाऱ्यांना कौतुकास्पद वाटणारी कामगिरी तुमच्याकडून होईल. संततीकडून सुवार्ता.

मकर : शुभ रंग : केशरी | अंक : ९
आज गृहसौख्याचा दिवस. नोकरदारांना कामावर दांडी मारायचा मूड राहील. आज सहकुटुंब सहलीस, करमणूकीस प्राधान्य द्याल. मुलांचे हट्ट पुरवाल.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
आज जास्त वेळ घराबाहेर जाईल. एखाद्या महत्वाच्या कामासाठी बरीच धावपळ होणार आहे.कार्यालयिन कामासाठी प्रवास घडतील. गृहीणींना थकवा जाणवेल.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : ४
आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल.