आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार, 9 फेब्रुवारीला 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...
मेष : शुभ रंग : निळा| अंक : ५
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.महत्त्वपूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.
वृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
आज अति आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ताकही फुंकून प्या.
मिथुन : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. नोकरदार वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.
कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
उच्चशिक्षितांना लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. व्यवसायात अडकलेली येणी वसूल होतील.
सिंह : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ४
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल.आनंदी दिवस.
कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : २
कुटुंबीयांमधे सामंजस्य राहील. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. आज आईचे मन दुखावू नका.
तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : १
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.
वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. विवाहविषयक बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.
धनू : शुभ रंग : केशरी| अंक : २
अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.
मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
आज काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.वैवाहिक जीवनात संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.
कुंभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ९
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील.
मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
चर्चेपेक्षा फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज वडिलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.