आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रह्मा नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

मंगळवार 9 जून रोजी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : २

कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. विवाह विषयक बोलणी आज टाळा.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ५

उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने आज नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांचा सहवास लाभेल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ६

सगळयाच गोष्टी आपल्याच मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा करु नका. आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. पत्नीचे ऐकाच.

सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. येणी वसूल होऊ शकतील.

कन्या : शुभ रंग : मरून | अंक : ९

प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. चैनीसाठी पैसा उपलब्ध होईल.

तूळ : शुभ रंग : गुलाबी  | अंक : २

कुटुंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील. मुलांचे लाड पुरवाल. आज खर्च आवाक्या बाहेर राहील.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८

कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. शेजारी सलोखा राहील.

धनू :  शुभ रंग : केशरी  | अंक : १

धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. आज गोड बोला.

मकर : शुभ रंग : पांढरा  | अंक : ४

आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. पत्नीशी एकमत राहील.

कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम  ढळून देऊ  नका. खर्चावर नियंत्रण गरजेचे.

मीन : शुभ रंग : निळा | अंक : ५

मोठया लोकांच्या ओळखी स्वार्थ साधून घेण्यासाठी वापराल. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.

बातम्या आणखी आहेत...