आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 9 मार्च रोजी उत्तराषाढा नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : आकाशी| अंक : ३
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. दगा देणारेच मित्र भेटतील.

वृषभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. आज महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे वळतील.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ४
भागीदारी व्यवसायात आज तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतील. देण्याघेण्याचे व्यवहार चोख असावेत. नव्या उपक्रमांची सुरुवात आज नको.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : २
कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमी असेल. काही कामे नि:स्वार्थीपणे कराल. जोडीदाराशी दुपारनंतर सुसंवाद.

सिंह : शुभ रंग : क्रीम|अंक : ८
एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी झाकली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे. मुले आज्ञेत राहतील.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
भागीदारी व्यवसायात तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतील. देण्याघेण्याचे व्यवहार चोख असावेत.

तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ६
मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. हातचे सोडून मृगजळामागे धावू नका.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
आवक पुरेशी असली तरी खर्च करताना जपूनच करा. संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवणार आहे.

धनू : शुभ रंग : तांबडा|अंक : ९
राशीच्या धनस्थानात प्रवेश करणारा चंद्र अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

मकर : शुभ रंग : निळा|अंक : ८
धंद्यात वाढती स्पर्धा बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजा जमाखर्चाचा तराजू डळमळीत करतील.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : २
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावरच ढकललेली बरी. काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागणार आहेत.

मीन : शुभ रंग : भगवा| अंक : ५
व्यवसायात आवक पुरेशी असेल. आज संध्याकाळी प्रिय मित्रांच्या सहवासात जुन्या आठवणींना उजाळा द्याल.

बातम्या आणखी आहेत...