आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैशाख पौर्णिमा:हा भगवान श्रीविष्णूंच्या उपासनेचा सण, या दिवशी पिंपळाची पूजा करण्याची परंपरा

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे. यालाच पिंपळ पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी पिंपळाची विशेष पूजा करण्याचे शास्त्रात सांगितले आहे.

स्कंद, पद्म आणि श्रीमद भागवत महापुराणानुसार या वृक्षावर सर्व देवता आणि पूर्वजांचा निवास असल्याचे मानले जाते. असेही म्हटले गेले आहे की, पिंपळ हे भगवान श्रीविष्णूचे जिवंत आणि पूर्णत: मूर्तिमान स्वरूप आहे.

पौर्णिमेला पितरांसाठी केलेल्या पूजेने पितर संतुष्ट तर होतातच शिवाय भगवान श्रीविष्णूची कृपाही मिळते. म्हणूनच वैशाख महिन्यातील पौर्णिमेला पिंपळाची पूजा करण्याचे महत्त्व सांगितले आहे.

श्रीमद भागवतात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, पिंपळ हे त्यांचेच रूप आहे. त्यामुळे पिंपाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. यामुळेच वैशाख महिन्यातील पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. त्याला अश्वत्थ असेही म्हणतात.

स्कंद पुराणानुसार, पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णू, देठात कृष्ण आणि फळ आणि फुलांमध्ये सर्व देवता वास करतात. पिंपळ हे भगवान विष्णूचे जिवंत रूप मानले जाते. त्याचवेळी श्रीकृष्ण श्रीमद्भागवत गीतेत म्हणतात की, सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष श्रेष्ठ आहे कारण ते माझे रूप आहे.

पिंपळाच्या पूजेने सुख-समृद्धी
पिंपळाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात. यामुळे समस्याही संपतात. या झाडामध्ये देव आणि पितर या दोघांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते. यामुळे महिलांचे सौभाग्य वाढते. धनलाभही होतो.

पिंपळ पूजन पद्धत
1.
सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर भगवान श्रीविष्णूची पूजा करावी.
2. मंदिरात पिंपळाचे झाड असलेल्या मंदिरात जावे. त्यानंतर तेथे पिंपळाची पूजा करावी.
3. पिंपळाच्या मुळावर गाईचे दूध, तीळ आणि चंदन मिसळून पवित्र जल अर्पण करावे.
4. जल अर्पण केल्यानंतर जानवे, फुले, प्रसाद आणि इतर पूजा साहित्य अर्पण करावे.
5. उदबत्ती-दिवे लावावेत आणि प्रथम भगवान श्रीविष्णूला आणि नंतर पितरांना नमन करावे.