आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तू टिप्स:बाथरूम आणि किचन जवळ असल्यास वाढतात वास्तू दोष, घरात तुळस, मनीप्लँट लावणे शुभ राहते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वास्तूच्या या गोष्टी लक्षात ठेवल्यास घरात कायम राहते सकारात्मकता

वास्तुशास्त्रामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवून नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे विविध नियम सांगण्यात आले आहेत. वास्तू नियमांचे पालन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि वास्तू विशेषज्ञ पं. मनीष शर्मा यांच्याकडून जाणून घ्या काही वास्तू टिप्स...

घरामध्ये कधीही बाथरूम आणि किचन जवळ-जवळ असू नये. ज्या लोकांच्या घरात बाथरूम आणि किचन जवळ असेल त्यांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. उपयोग झाल्यानंतर बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. बाथरूमच्या दारावर पडदा लावावा. असे केल्याने बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा किचनमध्ये प्रवेश करत नाही. बाथरूमचा दरवाजा उघडा राहिल्यास हानिकारक सूक्ष्म किटाणू किचनमध्ये प्रवेश करू शकतात आणि यामुळे आरोग्यही खराब होऊ शकते. यामुळे बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा.

घरामध्ये काटेरी आणि दूध (कापल्यानंतर पांढरे द्रव्य) निघणारे वृक्ष लावू नयेत. कारण काटे नकारात्मकता निर्माण करतात. यामुळे जीवनातील अडचणी वाढत राहतात. तुळशीचे रोप अत्यंत कल्याणकारी, बहुपयोगी, पवित्र आणि शुभ मानले जाते. तुळशीमध्ये अँटिबायोटिक तसेच औषधी गुण असतात. तुळशीचा स्पर्श आणि हवा दोन्ही लाभकारी ठरते. यामुळे घरात तुळस अवश्य असावी.

किचनमध्ये अग्नी आणि पाणी या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवू नयेत. हे दोन्ही तत्व एकमेकांपासून वेगळे आहेत. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवाव्यात. यामध्ये थोडे अंतर अवश्य असावे.

बातम्या आणखी आहेत...