आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तू:घरामध्ये गुलाब, चंपा, चमेलीच्या झाडांमुळे वाढते सकारात्मकता आणि दूर होतात वास्तुदोष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरामध्ये सजावटीसाठी लावले जाणारे लहान रोपटे उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे शुभ राहते

वास्तू शास्त्रामध्ये घराची सकारात्मक वाढवण्यासाठी आणि नकारत्मकता नष्ट करण्यासाठी टिप्स सांगण्यात आल्या आहेत. या टिप्सचे दैनंदिन जीवनात पालन केल्यास तुम्हाला शुभफळ प्राप्त होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीशी संबंधित टिप्स सांगण्यात आल्या आहेत. झाडे लावण्यासाठी कोणती दिशा शुभ राहते, याविषयीसुद्धा माहिती देण्यात आली आहे. कोकलताच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, झाडांशी संबंधित वास्तू टिप्स...

- डॉ. राठी यांच्यानुसार घरामध्ये गुलाब, चंपा, चमेली, मोगरा इ. फुलांची रोपे सकारात्मक ऊर्जा वाढवतात. हे रोपटे घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावीत.

- घरामध्ये तुळशीचे रोप लावायचे असल्यास यासाठीसुद्धा पूर्व किंवा उत्तर दिशा शुभ आहे. प्राचीन परंपरेनुसार घराच्या अंगणात तुळस अवश्य असावी. आयुर्वेदानुसार तुळशीची पाने अत्यंत गुणकारी आहेत. देवाच्या नैवेद्यामध्येही तुळशीची पाने टाकली जातात. दररोज सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावावा. यामुळे सकारात्मकता वाढते.

- घराच्या दक्षिण दिशेला कोणतेही झाड लावू नये. या दिशेला झाडे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

- घरामध्ये सजावटीसाठी लावले जाणारे लहान रोपटे उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे शुभ राहते. घरात छोटीशी बाग करावयाची असल्यास घराच्या पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला करू शकतात. ईशान्य कोणा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला फुल असलेले रोपटे आणि वेल लावू शकता.

- घरामध्ये झाडे लावल्याने वातावरण थंड राहते. हे पर्यावरणासाठीसुद्धा फायदेशीर आहे. हिरवळीमुळे घरात राहणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार नष्ट होतात आणि सकारात्मकता वाढते. रोपट्यांची खराब झालेली पाने लगेच काढून टाकावीत. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.

बातम्या आणखी आहेत...