आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शास्त्र:देवघरातील या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास प्राप्त होते पूजेचे श्रेष्ठ फळ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लक्ष्मी कृपेने घरामध्ये धन-धान्याची कमतरता भासत नाही

हिंदू घरांमध्ये देवघर अवश्य असते. जर हे देवघर वास्तुशास्त्राच्या नियमात असेल तर, याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर पडतो. घरातील देवघराची मांडणी ही दोषपूर्ण असल्यास त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या आर्थिक, मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो. येथे देवघराशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. या छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धन-धान्याची कमतरता भासत नाही.

या गोष्टींकडेही द्यावे विशेष लक्ष... देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. इतर देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत.

देवघरापर्यंत पोहोचावा सूर्यप्रकाश घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.