आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 वास्तू टिप्स:घराच्या पूर्व दिशेला लावावा सूर्यदेवाचा फोटो, देवघरात ठेवावे श्रीयंत्र आणि स्टडी टेबलवर ठेवावा पिरॅमिड

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरातील वस्तू चुकीच्या दिशेला असल्यास घरामध्ये नकारात्मकता वाढते

वास्तू शास्त्रामध्ये घरातील सर्व वस्तूंशी संबंधित नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरातील विविध वास्तुदोष नष्ट होऊ शकतात. घरातील वस्तू चुकीच्या दिशेला असल्यास घरामध्ये नकारात्मकता वाढते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्याकडून जाणून घ्या, वास्तूच्या काही खास टिप्स...

1. दिवा आणि धूप यासारखी पूजन सामग्री घराच्या आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावी. ही दिशा अग्नीशी संबंधित वस्तूंसाठी शुभ राहते.

2. घरामध्ये श्रीगणेशाचा फोटो किंवा मूर्ती असल्यास, हे घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. घरामध्ये श्रीगणेशाचा शेंदुरी रंगाचा फोटो लावल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात. हा फोटो उत्तर-पूर्व दिशेला लावावा.

3. घरामध्ये तुळस लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. मान्यतेनुसार घरामध्ये तुळस असल्यास देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. हे रोपटे योग्य दिशेला न ठेवल्यास शुभफळ प्राप्त होत नाहीत. घराच्या छतावर किंवा अंगणात उत्तर-पूर्व (ईशान्य)दिशेला तुळस लावावी.

4. सात घोड्यांच्या रथावर विराजमान सूर्यदेवाचा फोटो पूर्व दिशेला लावावा. रोज सकाळी या फोटोचे दर्शन घ्यावे. यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते.

5. घराच्या हॉल किंवा बैठक खोलीत पर्वत किंवा उडत्या पक्ष्यांचे फोटो लावावेत. या व्यतिरिक्त श्रीकृष्णाच्या बाल लीलांचे फोटो लावू शकता.

6. देवघरात श्रीयंत्रही ठेवावे. श्रीयंत्राला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. इतर देवी-देवतांसोबतच श्रीयंत्राचीही पूजा करावी.

7. मुलांचे अभ्यासात मन लागत नसल्यास स्टडी टेबलवर एक छोटेसे पिरॅमिड ठेवावे.

8. वास्तुनुसार घरामध्ये मनीप्लांटचे रोपेही लावावे. मनीप्लांटची पाने पिवळी पडल्यास किंवा खराब झाल्यास ती पाने काढून टाकावीत.

9. रोज सकाळ-संध्याकाळ घरामध्ये दिवा लावावा. यामुळे सकारात्मकता वाढते. गायीला पोळी खाऊ घालावी.

10. मुख्य दारावर श्रीगणेशाचा फोटो किंवा छोटीशी मूर्ती लावावी. यासोबतच घराच्या दरवाजावर लाल रिबिनमध्ये वास्तूचे तीन नाणे बांधून ठेवावेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser