वास्तू / सूर्यदेवाच्या फोटो किंवा मूर्तीसाठी पूर्व आणि श्रीगणेश मूर्तीसाठी उत्तर-पूर्व दिशा राहते शुभ

  • घरातील वस्तू चुकीच्या दिशेला असल्यास घरामध्ये नकारात्मकता वाढते

रिलिजन डेस्क

May 01,2020 12:10:00 AM IST

वास्तू शास्त्रामध्ये घरातील सर्व वस्तूंशी संबंधित नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरातील विविध वास्तुदोष नष्ट होऊ शकतात. घरातील वस्तू चुकीच्या दिशेला असल्यास घरामध्ये नकारात्मकता वाढते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्याकडून जाणून घ्या, 5 शुभ वस्तू आणि त्यासाठी शुभ दिशा. या वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.


- भगवान श्रीगणेशाचा फोटो घरात लावायचा असल्यास घराच्या उत्तर-पूर्व दिशेला शेंदुरी श्रीगणेशाचा फोटो लावावा. मूर्ती ठेवायची असल्यास घरामध्ये उत्तर-पूर्व दिशेला मूर्ती स्थापित करणे शुभ राहते.


- घराच्या हॉल किंवा बैठकीच्या खोलीत पर्वत किंवा उडत्या पक्ष्याचे फोटो लावावेत. याव्यतिरिक्त हॉल किंवा बेडरूममध्ये श्रीकृष्णाच्या बाललीला असलेले फोटो लावू शकता.


- दिवा, धूप-उदबत्ती यासारख्या पूजेमध्ये उपयोगात येणाऱ्या सामग्री घराच्या आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला ठेवाव्यात.


- घरामध्ये तुळशीचे रोपटे योग्य दिशेला न ठेवल्यास वास्तुदोष वाढतात. घराच्या छतावर किंवा अंगणात उत्तर-पूर्व दिशेला तुळस लावणे शुभ मानले जाते.


- सूर्यदेवासोबत सात घोड्यांचा फोटो लावणे शुभ मानले जाते. हा फोटो पूर्वी दिशेला लावावा. यामुले घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. पूर्व दिशेलाच सूर्योदय होतो.

X