आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवार, 10 फेब्रुवारी रोजी उत्तराषाढा नक्षत्र यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ७
नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक राहावे. तरुणांनी व्यसने व कुसंगत टाळावी. ज्येष्ठांचे तीर्थक्षेत्री प्रवास होतील.
वृषभ : शुभ रंग : केशरी| अंक : ५
आज कामधंद्यातील काही अडचणी मानसिक स्वास्थ्य बिघडवतील. विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नको.
मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल. आशादायी दिवस.
कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. आज तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाणार आहे.
सिंह : शुभ रंग : गुलाबी|अंक : ३
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.
कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : १
कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. आईकडून लाभ.
तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : २
आज धावपळीचा दिवस. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा उत्साह वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ.
वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ९
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडेल. घरात पाहुण्यांची वर्दळ असेल. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.
धनू : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लिष्ट कामेही सोपी होतील. एकांत हवासा वाटेल.
मकर : शुभ रंग : मरून| अंक : १
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल.
कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
व्यवसायाच्या दृष्टीन ओळखी होतील. वैवाहिक संबंधात गोडवा राहील. दिवस सत्कारणी लावा.
मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.ध्येयाकडे वाटचाल कराल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.