आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार 

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 10 जून रोजी श्रवण नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजचे ग्रह-तारे इंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. याव्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : मोतिया | अंक : ५

अती धावपळ टाळा. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.

वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : २

व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात रहा.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

उद्योगधंद्यातील करार मदार दुपारपूर्वीच उरकून घ्या. संध्याकाळी वाहन चालवताना सतर्क रहा. वैवाहीक जिवनांत आज दुपारनंतर मौन सर्वार्थ साधनम.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ६

आज रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. जोडीदाराने दिलेले सल्लेही मोलाचे असतील.

सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ९

नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वादविवादात समोरचा गप्प बसेल.

कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

व्यवासायात नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर असेल. कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८

आज तुमचे मनोबल वाढवणाऱ्या कही घटना घडतील. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकतील.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : २

व्यवसायात जाहीरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

आज धंद्यात आवक चांगली राहील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : १

कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. मित्रांच्या सहवासात रमाल.

कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ५

विरोधक सक्रिय अहेत, कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. मानसिक शांती मिळेल.

मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser