आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 10 मार्चचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. श्रवण नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : १
आजचा दिवस तुमचा आत्मविश्वास वाढविणाराच असेल. दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे उरका.
वृषभ : शुभ रंग : आकाशी| अंक : ३
कार्यक्षेत्रात सतर्कपणे राहून वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. नोकरदारांना सहकाऱ्यांमधे मिळून मिसळून राहूनच प्रतिकूल वातावरणावर मात करावी लागेल.
मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : २
भागीदारी व्यवसायात आज तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतील. देण्या-घेण्याचे व्यवहार चोख असावेत. नव्या उपक्रमांची सुरुवात आज नको.
कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.महत्त्वापूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.
सिंह : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक माघार घेतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल.
कन्या : शुभ रंग : क्रिम|अंक : ३
कुटुंबात आज काही मनासारख्या घटना घडतील. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.
तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामात उत्साह राहील. खर्चावर ताबा गरजेचा.
वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ६
कौटुंबिक वाद असतील तर दुपारनंतर सुसंवादाने मिटतील. काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल.
धनू : शुभ रंग: चंदेरी|अंक: ९
आज तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.
मकर : शुभ रंग : राखाडी|अंक: ८
हौशी मंडळींना जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. उपवरांना योग्य स्थळे चालून येतील.
कुंभ : शुभ रंग : भगवा| अंक : ५
तुमची मोठ्या लोकांसह उठबस फायदेशीर राहील. घराबाहेर तुमचे वक्तृत्व व कर्तृत्वही प्रभावी राहील.
मीन : शुभ रंग : मरून| अंक : २
नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावेच लागतील. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा बाळगू नका. नामवंतांचा सहवास लाभेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.