आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 12 ऑगस्ट 2020 रोजी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : मोतिया | अंक : १
नावे ठेवणाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करा. मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

वृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
कंजूषपणा बाजूला ठेवून आज काही अावश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील, सतर्क राहा. मित्रांना पार्टी आज नको.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांची फळे दृष्टिक्षेपात येणार आहेत.

कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : ४
रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. कर्तव्यपूर्ती होईल.

सिंह : शुभ रंग : हिरवा|अंक : २
काही क्षुल्लक अडचणींनी नैराश्य येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला थोडी एकांताची गरज भासेल.

कन्या : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
मनाच्या द्विधा अवस्थेत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता जास्त आहे. स्पर्धकांना कमजोर समजू नका.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ८
जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. व्यवसायात आर्थिक उलाढाली विश्वासात घेऊनच करा.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ७
नोकरीच्या ठिकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढलेला जाणवेल. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
हौसमौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
बराच काळ रखडलेल्या घरगुती कामांसाठी वेळ द्यावा लागेल. मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष द्यावे लागेल.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवलेला बरा.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
उद्योग-व्यवसायात मनाजोगती धनप्राप्ती होईल, नवे हितसंबंध तयार होतील. प्रवासात आपल्या वस्तूंची काळजी घ्या.

0