आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 13 जानेवारी रोजी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : १
कामाचा ताण, अति महत्त्वाकांक्षा यामुळे आज काहीसे त्रस्त व्हाल. कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल.

वृषभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ९
उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने नव्या उपक्रमाची सुरुवात टाळा. आज तुम्हाला भक्तिमार्गात गोडी वाटेल. सज्जनांच्या सहवासात तुमचे मन रमेल.

मिथुन : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा करून चालणार नाही. वैवाहिक जीवनात थोडी कुरबुर राहील. वाहन चालवताना डोके शांत ठेवा.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
स्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज जोडीदारास वेळ देणे हिताचे.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ७
अति श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. वैवाहिक जीवनात जोडीदार जे म्हणेल त्याला हो म्हणणे हिताचे.

कन्या : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ५
कष्टांचाही अतिरेक करू नका. आज हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क हिताचे राहील. गृहिणींसाठी व्यस्त दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ६
काही जणांना घरदुरुस्तीच्या काही किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. महत्त्वाचे मेल्स येतील.

धनु : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
नवे उपक्रम जोमाने सुरू करता येतील. महत्त्वाच्या वाटाघाटीत आपल्याच मुद्यावर अडून राहता येईल.

मकर : शुभ रंग : भगवा| अंक : ४
एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक आज नमते घेतील.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
उच्च शिक्षितांना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील.

बातम्या आणखी आहेत...