आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 14 एप्रिलला भरणी नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
एखाद्या चांगल्या बातमीने दिवसाची सुरुवात होईल.आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल.

वृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
कामधंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक उलाढाली आज नकोत.

मिथुन : शुभ रंग : मोरपिशी| अंक : ७
जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
सडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवा.

सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
अति श्रमांमुळे थकवा जाणवेल. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. संयम ठेवा.

कन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या चर्चा आज टाळलेल्याच बऱ्या.

तूळ : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९
आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवास होतील.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. प्रेमप्रकरणे मात्र डोक्याला नसता ताप देतील.

धनू : शुभ रंग : क्रीम| अंक : २
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
वास्तू खरेदीसाठी कर्जमंजुरी होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कुंभ : शुभ रंग : मोतिया|अंक : ३
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी.

मीन : शुभ रंग : मरून|अंक : ६
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील.

बातम्या आणखी आहेत...