आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 14 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्वांगफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : मोतिया| अंक : ३
व्यवसायात नवे हितसंबंध तयार होतील. स्थावराचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. तब्येत उत्तम राहील.

वृषभ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवायची जिद्द बाळगाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. जागेविषयी प्रश्न सुटतील.

मिथुन : शुभ रंग : केशरी|अंक : ३
कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या काही जुन्या ओळखी आज कामी येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. मुलांना अभ्यास बोअर करेल.

कर्क : शुभ रंग : हिरवा|अंक : २
वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. पैशाची कमतरता भासणार नाही.

सिंह : शुभ रंग : मरून| अंक : १
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे. आज अहंकारास लगाम गरजेचा असेल.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवून वागलेले बरे.अति आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल.

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
दैवाची उत्तम साथ असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ध्येयप्राप्ती होईल.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
आज तुमचा कामातील उरक चांगला राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. उत्साही दिवस.

धनु : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
आज दैव तुमच्याच बाजूने आहे. कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील. घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : १
उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा मोह होईल. पण तसे न करता आज फक्त ध्येयावर लक्ष कंेद्रित करा.

कुंभ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ५
कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात जुन्या स्मृती मनास आनंद देतील.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण हिताचे राहील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser