आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 15 डिसेंबर रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
आर्थिक सुबत्ता येईल. तुमचा उत्साह व कार्यक्षमता चांगली असेल. विरोधकांनाही आपलेसे कराल.
वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीकडेही लक्ष द्यावे.
मिथुन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
अनुकूल घटना तुमच्या आत्मविश्वासात भर घालतील. लॉकडाऊन मुळे रखडलेली कामे मार्गी लागतील.
कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
नोकरीच्या ठीकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. मित्र दिलेली अश्वासने अजिबात पाळणार नाहीत.
सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
नोकरीच्या ठीकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक कामास प्राधान्य देणे आज हिताचे राहील.
कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : ६
मान अपमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हींग टाळा.
तूळ : शुभ रंग : लाल| अंक : ४
आज तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील.
वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : २
आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर मात्र वसूल होतील.
धनु : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. मोहाचे प्रसंग टाळा. आज मौजमजा करण्याकडे तुमचा कल राहील.
मकर : शुभ रंग : निळा| अंक : १
आज तुम्ही उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना आज प्रकृती उत्तम साथ देईल.
कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : १
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदगच जास्त होईल. भावंडात सुसंवाद राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.