आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार 

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार, 15 जुलै रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : जांभळा | अंक : २

आर्थिक अडचणी असतील तर त्यावर मार्ग निघेल. प्रवास कंटाळवाणे होतील. मौल्यवान ऐवज सांभाळा.

वृषभ: शुभ रंग : केशरी | अंक : ४

इतरास दिलेले शब्द पाळावे लागतील. गरजूस मदत कराल. आपले म्हणणे इतरांना पटलेच पाहिजे असा अट्टहास आज करून चालणार नाही.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ३

कार्यक्षेत्रात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ९

दैनंदिन कामातही अडथळे येतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. आज सत्संगात रमाल.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १

आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनीही राग अनावर होईल.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : १

आज मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. आज वादविवाद टाळाच.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४

तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. पत्नीच्याही लहरी सांभाळाल.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ८

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले आज्ञा पाळतील.

कुंभ : शुभ रंग : चॉकलेटी | अंक : ७

कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादाने मिटतील. आज प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होऊ शकतील.

मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५

आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्त्वाची मेल्स येणार आहेत. 

0