आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 15 जून रोजी मूळ नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार शुभ नावाचा खास योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष : शुभ रंग : क्रिम| अंक : १
व्यावसायिक महत्वाचे करार आज दिवसाच्या उत्तरार्धात कराल तर बरे. अधिकार जपून वापरा.
वृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
अनोळखी व्यक्तींवर चुकुनही विश्वास ठेऊ नका. आज प्रवासात किमती ऐवज सांभाळा. सतर्क रहा.
मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
आज क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.
कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. गृहीणींना थकवा जाणवेल.
सिंह : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी.
कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा.
तूळ : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आईचेे सल्ले योग्यच असतील.
वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
आर्थिक सुबत्ता येईल. मृदु वाणीने विरोधकांना आपलेसे कराल. आज शेजारी सलोखा राहील.
धनु : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील.
मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार नको.
कुंभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष द्यावे.
मीन : शुभ रंग : निळा| अंक : ५
कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तब्येत नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.