आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 15 फेब्रुवारी 2022 ला आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : २
नोकरीच्या ठीकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. कितीही राबलात तरी वरीष्ठांचे समाधान अश्यक्य.
वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी महत्वाच्या बातम्या येतील. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आईचेे सल्ले योग्यच असतील.
मिथुन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
आर्थिक सुबत्ता येईल. आज तुम्ही जीभेवर साखर ठेऊनच घराबाहेर पडाल. शेजारी सलोखा राहील.
कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. अपेक्षित लाभाने कामातील उत्साह वाढेल.
सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
पैशाची आवक मुबलक राहील. एखादी हरवलेली वस्तू परत शोधल्यास सापडेल. दिलेले शब्द पाळाल.
कन्या : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
नोकरी धंद्याच्या ठीकाणी अहंकारास थारा देऊ नका. हितशत्रू मित्रांमधेच लपलेले असतील, सतर्क रहा.
तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
नोकरीधंद्यात अनुकूलता वाढेल. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. काही अपेक्षित लाभ होतील.
वृश्चिक : शुभ रंग : क्रिम| अंक : १
नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांची कृपा राहील. उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला असेल.
धनु : शुभ रंग : निळा| अंक : ५
कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तराही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस आज दैव अनुकूल राहील.
मकर : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
आज तुम्ही आधी स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठया आर्थिक उलाढाली आज टाळा.
कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधकांनाही तुमचे विचार पटू लागतील. आज आशादायी दिवस.
मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
काही व्यावसायिक येणी असतील तर वसूल होतील.विवाह विषयक बोलणी आज दुपारपूर्वीच उरका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.